पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर…

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील युवा संमेलनात मार्गदर्शन करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे.

जानेवारीत भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांशी निगडित विंगशी संबंधित संमेलन नाशिकमध्ये होत आहे. संमेलनात देश पातळीवरील निवडक सुमारे ८ ते १० हजार युवा कार्यकर्ते सहभागी होणार आहे.

याच संमेलनातील सहभागी युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. पंतप्रधान नाशिकमध्ये येत असल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. 

होऊ घातलेल्या संमेलनाचे ठिकाण अद्याप निश्चित असले तरी संभाव्य ठिकाणांची माहिती घेत पोलिसांकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली जात आहे. त्याचप्रमाणे, कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यासाठी बाहेरून मागविण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले जात आहे.

🤙 8080365706