मुंबई : भारतात अनेक राज्यांची, शहराची ओळख वेगवेगळी आहे. काही शहरांची ओळख ही त्या शहरात घेतली जाणाऱ्या पीकांवर देखील आहे. अशीच ओळख महाराष्ट्रातील शहरांची आहे.महाराष्ट्रात कोकणातील आंबा, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री अशी ओळख आहे. यानंतर आता बदलापूर हे शहर जांभळाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे.
कृषी उत्पादनात भौगोलिक निर्देशांक हे बदलापुरात उत्पादन घेतलेल्या जांभळांना मिळाले आहे. बदलापूर आता जांभळाचे शहर म्हणून नावारुपाला येणार आहे. जांभूळ हे फळ खाण्यासाठी चवदार असेत. त्याच्या गोड आंबट चवीमुळे त्याची बाजारात मागणी असते. बदलापुरातील जांबळे हे मुंबई, उपनगर तसेच अनेक शहरांत लोकप्रिय आहेत. त्यामुळे बदलापूरमधील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
बदलापूरातील जांभळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, असे एका संशोधनातून समोर आले आहे. इतर जांभळापेक्षा बदलापूरातील जांभूळ हे विशिष्ट आकारात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जाभळांना भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. या प्रयत्नांना यश आले आहे. ही माहिती चैन्नईतील भौगोलिक मानांकन रजिस्ट्रीमधून मिळाली आहे. याची सरकारी गॅझेटमध्ये नोंद करण्याची प्रोसेस सुरु आहे.
बदलापूर शहरातील जवळपास २० गावांतील १२०० झाडे शोधून त्या माहितीच्या आधारे हा डेटा गोळा करण्यात आला आहे. बदलापूर हे भौगोलिक मानांकन प्राप्त होणारे देशातील पहिले शहर आहे.