करवीर: कुरुकली ता.करवीर येथील
सेवानिवृत मंडल अधिकारी टी.आर.पाटील’ यांनी महसुल विभागात प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल तसेच अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी कोल्हापूर जिल्हा तलाठी व मंडल अधिकारी सह
पत संस्थेचे उद्घाटन व दिपप्रज्वलन जिल्हाअधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाअधिकारी राहुल रेखावर म्हणाले,
जेष्ठ सेवानिवृत तलाठ्यानी पत संस्थाचे रोपटे लावले त्याचे आज वटवृक्ष झाला आहे. या संस्थेची प्रगती साधण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक काम करावे असे आवाहन केले.
अप्पर जिल्हा अधिकारी संजय शिंदेला म्हणाले, तलाठ्यानी व मंडल अधिकारी यांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता शासनाच्या वतीने मिळणाऱ्या पगारात समाधान मानून प्रामाणिक काम करावे असे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी अध्यक्ष ज्ञानदेव डुब्बल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सभापती वैभव कोंडेकर,पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष टी.आर.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी निस्वार्थी भावनेने तलाठी म्हणून काम केलेले पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष टी.आर.पाटील यांच्या सह संस्थापक संचालकांचा जिल्हाअधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सुर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष अनिल काटकर,रणजीत पाटील, उपसभापती गणेश गवळी,चिटणीस संतोष पुंडलीक, तहसिलदार अनिता देशमुख ,माजी जिल्हा अध्यक्ष धनाजी कलिकते, शिवकुमार पाटील, सुभाष निकस
वैभव कोंडेकर
उदय लांबोरे .
प्रकाश महाडेश्वर
आदी कोल्हापूर जिल्हातील तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी मोठ्या संखेने उपस्थित होते.