कोल्हापूर येथे भारत राष्ट्र समिती आणि शेतकरी संघटना बैठक पार पडली.

कोल्हापूर: आज दि.28 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठकीस प्रमुख शेतकरी संघटना अध्यक्ष मा.रघुनाथदादा पाटील,भारत राष्ट्र समितीचे व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत पन्हाळा तालुक्यातील वाळवेकरवाडी या ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदी निवडून आल्याबद्दल सौ.वर्षा शिवाजी कुंभार यांचा सर्वानुमते सत्कार श्री.संग्राम कुंभार यांनी स्वीकारला.

भारत राष्ट्र समितीचे काम कोल्हापूर जिल्ह्यात लौकिकास आणून सर्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा शाहू महाराजांची कार्यपद्धती भारत राष्ट्र समिती पक्षामार्फत दाखवून देणेची आहे. सर्वांनी मा.के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यात केलेल्या कार्याचा आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला व सर्वच घटकांपर्यंत सुजलाम सुफलाम केला. आता भारत राष्ट्र समिती मार्फत आपण शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या भावना जाणणारे राज्य आणायचे आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका लढून भ्रष्टाचारी व घराणीशाही थांबवून सर्व सामान्य माणसाला सन्मानाने जगण्यास येईल असे राज्य तयार करायला मा.चंद्रशेखर राव यांचे हात बळकट करणार.

जिल्ह्यातील तालुका स्तरावरील समन्वयकांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन “अब की बार किसान सरकार” आणण्यास जे काही कष्ट घ्यायचे आहे. त्यास आज पासून सुरुवात केली असे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले.

यावेळी बैठकीस शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अँड.माणिक शिंदे, भारत राष्ट्र समिती जिल्हा समन्वय दोहित बक्षू, गुणाजी शेलार, उत्तम पाटील, ज्ञानदेव पाटील, युवराज आडनाईक, ज्योतीराम घाडगे, संदीप माळी, परशुराम शिंदे, प्रा.शाहिद शेख, शाहीन बारगीर, राजेश (बाळ) नाईक, तन्वीर मुल्ला, सुनील नाईक, रमेश शिरगावकर, विठ्ठल जाधव, अल्लाबक्ष काजी, कृष्णात पाटील, प्रणव आरळेकर, संग्राम कुंभार, मनीष महागावकर, विजय मोहिते, शिवप्रसाद भिंगाडे, मानसिंग आडके, मयूर मोहिते, राहुल मोहिते, बाळासो तांदळे, चंद्रशेखर मस्के, जगन्नाथ चिपरीकर, विनोद कुसाळे, उत्तम पाटील, ज्ञानदेव पाटील, महादेव नाईक, सचिन अडसुळे, राजवीर शिरतोडे, तेजस नाईक, दिलीप घोरपडे, खालीद इनामदार, बबनराव गावडे, सुनील पोतदार आदी प्रमुख उपस्थित होते.

🤙 9921334545