ऊस विकास कार्यक्रम पारदर्शकपणे राबविणार : राजे समरजितसिंह घाटगे.

सावर्डे बुद्रुक/ प्रतिनिधी
होऊ घातलेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही सत्तेवर येताच “ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा आणि ऊस विकास कार्यक्रम” अत्यंत पारदर्शकपणे राबवू असे मत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

श्री.दुधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाकवे, आनूर,बानगे,मळगे बुद्रुक, मळगे खुर्द,चौंडाळ आदी गावातील कार्यकर्त्यांच्या आयोजित भेटी प्रसंगी ते बोलत होते.

 घाटगे पुढे बोलताना म्हणाले, बिद्री कारखान्याच्या विद्यमान कारभारी मंडळींनी कागल तालुक्याला विश्वासात न घेता कारभार सुरू आहे. आजही बिद्री कारखान्यात चिठ्ठ्यांवर लागलेले कर्मचारी चिठ्ठ्यांवरच सेवानिवृत्त होत आहेत अशी  खंत व्यक्त करून आमची सत्ता आल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांचा  प्रश्नही मार्गी लावत कारखान्याचा कारभारही  पारदर्शकपणे करून उपेक्षितांना न्याय मिळवून देऊ.

याप्रसंगी मळगे बुद्रुकला प्रमोद अस्वले, बाळकृष्ण कमळकर, बापुसो अस्वले व दिगंबर अस्वले, बालाजी फराकटे, मळगे खुर्द साताप्पा पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील आनूर  येथे दत्तामामा कोईगडे, बाळासाहेब चौगुले,राजश्री चौगुले, श्रीपती खोत,सावंता देवडकर,विजय खोत,

चौंडाळ येथे सरपंच मारुती पाटील, उपसरपंच शामराव पाटील, हिंदुराव रेपे ,मारुती पाटील यासह सभासद हजर होते. स्वागत सरपंच मारूती पाटील यांनी तर आभार आप्पासाहेब रेपे यांनी मानले.धनंजय पाटील, पी.डी.चौगुले, बंडोपंत चौगुले, ए.डी.पाटील, डॉ. विजय चौगुले, रवींद्र पाटील, अजित पाटील, आनंदा पाटील, गजानन चौगुले, सुनिल देवडकर, संदीप पाटील उपस्थित होते.

बिद्रीच्या विद्यमान नेतृत्वाकडून कागलकरांवर अन्याय

2005 मध्ये स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आणि स्व. खास. मंडलिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली बिद्रीच्या कार्यक्षेत्रातील कागल तालुक्यातील गावांना न्याय मिळत होता. मात्र आज त्यांच्या पश्चात या तालुक्यातील कर्मचारी, विभागीय कार्यालये,ऊस विकास कार्यक्रम, तोडणी कार्यक्रम या चार प्रमुख घटकांकडे कारखान्याच्या व्यवस्थापनाने हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले आहे..

🤙 9921334545