निपाणी: निरंजन दुध संस्था सौंदलगा (ता.निपाणी)या दुध संस्थेने म्हैस दुधासाठी १६% व गाय दुधासाठी६ % असा उच्यांकी बोनस वाटप करून दुध उत्पादकांचे हित जोपासले असून या दुध संस्थेचे कार्य नेहमीच दुध उत्पादकांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रा.सुरेश डोणे यांनी केले.ते बोनस वाटप मार्गदर्शनपर कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
प्रा.सुरेश डोणे पुढे म्हणाले की,दुध उत्पादकांनी पारंपरिक दुध उत्पादन पद्धतीचा वापर न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दुध उत्पादन घेणे गरजेचे आहे. जास्त दुध उत्पादनासाठी हरियाणा ,मुरा यासारख्या म्हैसी पाळणे गरजेचे आहे.जनावरांच्या आहारा बरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रा.योगेश माने म्हणाले की,निरंजन दुध संस्था ही गेली २५ वर्षे दुध उत्पादक व सभासदांच्या हिताचे कार्य करीत आहे. बिनव्याजी १२ते१५ लाख रुपयांचे कर्ज वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले असून भविष्यात डॉक्टर सेवा व जनावरे तसेच उत्पादकांच्या मेडिकल पॉलिसी साठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
म्हैस दुध जादा उत्पादनाबद्दल श्री.मारुती भैरू परमकर (प्रथम क्रमांक),श्री.उत्तम राजाराम पाटील(द्वितीय क्रमांक),श्री.सुनिल बाबुराव कुर्ले(तृतीय क्रमांक),श्री.विक्रम सखाराम पाटील(चतुर्थ क्रमांक) त्याचबरोबर गाय दुध जादा उत्पादनाबद्दल श्री.मनोहर बाळकृष्ण चौगुले(प्रथम क्रमांक),श्री.नरसिंग रघुनाथ पाटील(द्वितीय क्रमांक),श्री.पिंटू दत्तात्रय शेवाळे(तृतीय क्रमांक)यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा पुजा माने,डॉ.सुधाकर पाटील, डॉ.विवेक माने,धनाजी पाटील,सुनिल कुर्ले, बाळासाहेब महाडिक,सज्जन पाटील,उत्तम पाटील,नानासो पाटील,मारुती परमकर,प्रसाद इनामदार, बाबासाहेब शेळवाडे, विक्रम पाटील,उदय पाटील, नरसिंग पाटील,सतिश चौगुले,संतोष माने उपस्थित होते.
सूत्रसंचालन धनाजी पाटील व शिवाजी किरळे यांनी केले,प्रस्तावित सुनिल कुर्ले यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव हृतिक हरेल यांनी मानले.