फ्रोजन फूड आपल्या आरोग्यासाठी किती घातक जाणून घेऊया…

रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना कमी वेळेत होणारे आणि झटपट खायला मिळणारे खाद्यपदार्थ आवडतात. या खाद्यपदार्थांमध्ये फ्रोजन फूड आणि पॅकबंद खाद्यपदार्थांचा समावेश होतो.या प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्याचा लोकांचा ट्रेंड देखील वाढला आहे. कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे लोकांनी ताजे अन्न बनवण्याऐवजी बाजारातून तयार फ्रोजन फूड खाण्यावर आणि ते खेरदी करण्यावर भर दिला आहे.

मात्र, हे फ्रोझन फूड आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे? हे तुम्हाला माहित आहे का? या फ्रोझन फूडमध्ये हायड्रोजनेटेड पाम तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या तेलामध्ये हानिकारक ट्रान्स फॅट्स असतात. या तेलासोबतच सोडिअमचा वापर ही मोठ्या प्रमाणात केला जातो.

त्यामुळे, याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. या फ्रोझन फूडच्या सेवनामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. कोणते आहेत हे आजार? चला तर मग जाणून घेऊयात.

Childrens Health : थंडीत लहान मूले आजारी पडतात? मग ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी

मधुमेहाचा धोका

फ्रोझन फूडमध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचा वापर केला जातो. ज्यामुळे, या प्रकारचे खाद्यपदार्थ किती ही दिवस टिकू शकतात. मात्र, यातील स्टार्च आपल्या पोटात गेल्यानंतर त्याचे पचन होण्यापूर्वीच स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. परिणामी, आपल्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे, मधुमेहाचा धोका वाढतो.

रक्तदाब वाढतो

फ्रोझन फूड आणि पॅकबंद असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढू शकते, असे संधोधनातून समोर आले आहे. फ्रोझन फूडमध्ये हायड्रोजनेटेड पाम तेलाचा आणि सोडिअमचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे स्ट्रोक्स आणि हृदयविकार सारख्या समस्यांचा धोका देखील वाढतो. 

वजन वाढते

फ्रोझन फूड हे अनेक दिवसांपासून गोठवलेले असतात. त्यामुळे, त्यातील पौष्टिक घटक, व्हिटॅमिन्स आणि खनिजे नष्ट झालेली असतात. या उलट ताज्या शिजवलेल्या अन्नामध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर आढळून येते.

शिवाय, फ्रोझन फूडमध्ये फॅट्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढते.

🤙 9921334545