भोगावती’ साठी काँग्रेस-राष्ट्रवादी- शेका पक्ष-जद आघाडीचे पॅनेल जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष जनता दलाच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवारांची बुधवारी रात्री उशिरा घोषणा करण्यात आली. विद्यमान उपाध्यक्षांसह ११ संचालकांना पुन्हा संघी आहे. सत्ताधारीला 14 राष्ट्रवादी आणि शेकापक्षाला 11 जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, १९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार संपतराव पवार-पाटील या दोन गटांचे मनोमिलन झाले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस व शेका पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसचा ए वाय पाटील गट व जनता दलही सहभागी झाला आहे.

   निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत व प्रयत्न झाले; मात्र जागा वाटपाचा नि सुटल्याने निवडणूक बिनविरोध  होवू शकली नाही, आ. पी. एन. पाटील,  ए.वाय. पाटील व क्रांतिसिंह पवार-पाटील यांनी  पॅनेल जाहीर केले. 

 यामध्ये विद्यमान उदयसिंह पाटील- कौलवकर यांच्यासह 11 संचालकांना पुन्हा गंधी देण्यात आली आहे. तर माजी संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे, तसेच १ नवीन चेहन्यांना संधी देण्यात आली आहे.

गटनिहाय उमेदवार असे : उदयसिंह बाळासाहेब पाटील कौलवकर( कौलव) धीरज विजयसिंह डोंगळे (घोटवडे) राजाराम शंकर कवडे (आवळी बुद्रुक)

गट क्रमांक २ राशिवडे बुद्रक : कृष्णराव शंकरराव पाटील, अविनाश तुकाराम पाटील (दोघे राशिवडे बुद्रक), आनंदा धोंडीराम चौगुले (शिरगाव)अनिरुद्ध कर्फ मानसिंग विष्णुपंत पाटील (तारळे खुर्द.)

गट क्रमांक ३ कसबा तारळे : अभिजित आनंदराव पाटील (गुडाळ) रवींद्र दत्तात्रय पाटील, दतात्रय हणमंत पाटील ( दोघे कसबा तारळे).

गट क्रमांक: 4 कुरुकली धोंडीराम ईश्वरा गोपाळ पाटील (परिते) शिवाजी पांडुरंग कारंडे (बेले), पांडुरंग शंकर पाटील (कुरुकली) केरबा भाऊ पाटील (कुरुकली) गट क्रमांक ५ सडोली खालसा : शिवाजीराव आनंदराव देवळेकर-पाटील( देवळे) भीमराव अमृता पाटील (वाशी), रघुनाथ विठ्ठल जाधव (बाचणी) अक्षयकुमार अशोकराव पवार-पाटील (सडोली खालसा).
गट क्रमांक ६ हसुर दुमाला : प्रा. डॉ. सुनील आनंदराव खराडे, सरदार चिल्लाप्पा पाटील ( दोघे हसूर दुमाला).
महिला : सौ. सीमा मारुतराव जाधव (बाचणी), सौ. रंजना दिनकरराव पाटील (आणाजे).इतर मागास वर्ग: हिंदुराव दादू चौगुले (ठिकपूरली)
मागास वर्ग : दौलू गंगाराम कांबळे (आमजाई व्हरवडे), ‘भटक्या विमुक्त जाती : तानाजी गोविंद काटकर ( ठिककपुरली)