पारंपारिक कारागिरांना सन्मान, समृध्दी देणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना – प्रा.अनिल सोले

कोल्हापूर (प्रतिनिधी) समाजातील पारंपारिक कारागिरांना सन्मान, सामर्थ्य व समृध्दी देणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रा.अनिल सोले यांनी केले. ते भाजपाच्या पश्चिम महाराष्ट् विभागाच्या विश्वकर्मा योजनेच्या शाहू स्मारक हॉल कोल्हापूर येथे आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र संघटणमंत्री मकरंद देशपांडे,प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पश्चिम महाराष्ट्र संयोजक सुदर्शन पाटसकर,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सदस्य राहुल चिकोडे,विश्वकर्मा जिल्हा संयोजक आनंद गुरव, विजयेंद्र माने, संदीप कुंभार, सविता मदने आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा.अनिल सोले यांनी सीएससी सेंटरवर नोंदणी कशी करावी व योजनेविषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी सी एस सी सेंटर व खादी ग्रामोद्योगच्या तज्ञांनीही मार्गदर्शन केले. ही योजना बारा बलुतेदार समाजातील पारंपारिक कारागिरांना सन्मान, सामर्थ्य व समृध्दी देणारी योजना आहे असे प्रा. सोले यांनी सांगितले. विश्वकर्मा प्रमाणपत्र, प्रशिक्षण, टुल किट, पहिला टप्पा एक लाख, दुसरा टप्पा दोन लाख कर्ज ५ टक्के दराने मिळणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

संयोजक सुदर्शन पाटसकर यांनी लाभार्थी साठीचे योजनेची व्याप्ती लाभ कुणा कुणाला घेता येऊ शकतो हे सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील कारागिरांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी या योजनेची माहिती मंडल निहाय बैठका घेऊन दिली जाईल व कोल्हापूर शहरातील या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे सांगितले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनीही आपले या योजनेविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमात सूत्रसंचालन आनंद गुरव व आभार प्रकाश ढंग यांनी मानले.

याप्रसंगी भाजपा पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706