करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढाकाराने पेन्शन धारकांची दिवाळी गोड

     कोल्हापूर :  उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १४ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ४०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली.

     संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मार्केट यार्ड येथे पेन्शन दिली जाते.पेन्शनधारक हे सर्वाधिक जेष्ठ नागरिक असल्याने त्यांना मार्केट यार्ड येथे जाणे गैरसोयीचे होते. त्यामुळे ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगावातील पेन्शन धारकांना आज उंचगाव येथील मंगेश्वर मंदिर या ठिकाणी कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली. करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने आज ४०० लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले.

यावेळी गेली २ ते ३ महिने पेन्शन मिळाली नसल्याने.त्यामुळे दिवाळी सणाच्या आधी पेन्शन मिळाल्याने पेन्शनधारकांनी समाधान व्यक्त केले तसेच करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने आमची दिवाळी गोड झाली अशी भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

    यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,अजित चव्हाण, केरबा माने तसेच बँकेचे कर्मचारी सुनिल केसरकर,मिलींद प्रभावळकर, विजया माने आदी उपस्थित होते.

🤙 8080365706