बालिंगा :(प्रतिनिधी) बालिंगा ता. करवीर येथील सकल मराठा समाज करवीर पश्चिम यांचे वतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर -गगनबावडा रोड डॉ. आंबेडकर चौकात रास्तारोको करून व मोठ्याप्रमाणात एक मराठा ,लाख मराठा या घोषणाबाजी करुन जरांगे पाटील यांचे उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
बालिंगा येथे सकल मराठा समाजाची एक कमीठी स्थापण केली असून आरक्षणाचे मागणीसाठी गेली सहा सात दिवस झाले वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत या करीता हनुमान मंदिर परिसरात एक बैठक व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये साखळी उपोषण चालु आहे, तसेच कॅंडल मार्च ही काढला असुन बालिंगा हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी फेरी काढली आहे.
आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सर्व पक्ष ईथे एकत्रित आले आहेत. या सर्व आंदोलनात
राष्ट्रवादी चे मधुकर जांभळे,भाजपचे अमर जत्राटे, युवराज जत्राटे,बालिंगा तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पवार, सेनेचे अजय वाडकर, मनोहर जांभळे, श्रीकांत भवड, जनार्दन जांभळे,धनंजय ढेंगे, बाजीराव माने, माऊ जांभळे, नंदकुमार जांभळे, पांडुरंग वाडकर, सनी भवड, अजय भवड, प्रकाश जांभळे, तसेच मयुर जाभळे,ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, उपसरपंच, गावचे दुध संस्था व विकास सोसायटीचे सदस्य आणि गावातील तरुण तरुणीं आणि महिलांचा समावेश आहे.