L
साळवण (एकनाथ शिंदे ) : जागतिक शैक्षणिक पॉवर हाऊस म्हणून ओळखणाऱ्या कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या १४व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय IEEE परिषदेमध्ये कोल्हापुरातील संशोधक विजय कानडे यांनी शाश्वत बायोफायबर्स आधारित सिग्नल वर्तकाचे अनावरण केले.
त्यांचे हे संशोधन वायफाय सिग्नल वाढवण्यासाठी, अधिक पर्यावरणास अनुकूलन आणि प्रभावी उपाय प्रदान करून, वनस्पती मधून मिळणाऱ्या बायोफायबरचा फायदा घेऊन गुणवत्ता सुधारण्यासाठीचा एक अभिनव उपक्रम होता. त्यांच्या संशोधन कार्यासाठी एक प्रोटोटाईप विकसित केला असून त्याबद्दल त्यांना असं उत्कृष्ट संशोधन कार्य पुरस्कार मिळाला आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये १८हून अधिक देश सहभागी असून ९० हून अधिक विद्यापीठे व १२३ कंपन्याकडून संशोधन प्रस्ताव सादर करण्यात आले. यामध्ये जगभरातील अनेक नामांकित विद्यापीठे सहभागी झाली होती. यातून जगात तंत्रज्ञानाच्या क्रांतीसाठी आवश्यक असलेले जागतिक सहकार्य आणि विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.
त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर मधून झाली. विविध कार्पोरेट संस्थांच्या माध्यमातून त्यांनी संशोधन जगतात प्रवेश केला. संशोधना प्रति असलेल्या समर्पणामुळे त्यांना आज प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जागतिक विद्यापीठाकडून आमंत्रण मिळत आहेत. विपुल संशोधन पोर्ट फो, कानडे स्पिंगर ,IEEE,ACMआणि स्कोपस द्वारे अनुक्रमित प्रतिष्ठित आणि कॉन्फरन्स मध्ये ५० हून अधिक प्रकाशने उपलब्ध आहेत. संशोधन पुरस्कारातून मिळणारी रक्कम सामाजिक दायित्वातून पीएम केअर फंडाला देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झालं:
कानडे यांच्या संशोधनाला त्यांची आई प्रा. जया कानडे यांच्याकडून सातत्याने भक्कम पाठबळ आणि सहकार्य मिळाले .बारावीला च्या वर्गात शिकत असताना वडील डॉ. प्राचार्य ए. एस. कानडे यांचे निधन झाले. आईचा दृढ निश्चय, बहिण पूजाची साथ यांच्या जोरावर विजयने जागतिक स्तरावर कोल्हापूरचा झेंडा संशोधन क्षेत्रात अटकेपार लावून वडिलांचे स्वप्न साकार केले.