इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 या 31 व्या ऊस गाळप हंगामासाठी विजयादशमीच्या शुभदिनी काटा व गव्हाण पूजन कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहूल आवाडे आणि व्हा.चेअरमन बाबासो चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाला.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते मोळी पूजन करून गाळप हंगामाचा मुहुर्त करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी किशोरी आवाडे उपस्थित होते.
कारखान्याकडे 2023-24 हंगामाकरीता सुमारे 21 हजार 700 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. मागील हंगामाप्रमाणेच कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्यांनी चालू गाळप हंगामातही आपला पिकविलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले. राज्य शासनाच्या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2023 पासून रितसर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामास सुरुवात होणार आहे.
चालू गळीत हंगामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगून त्यांनी सर्व सभासद, ऊस पुरवठा करणारे शेतकरी, अधिकारी-कर्मचारी या सर्वांना विजयादशमी व गाळप हंगामाकरीता शुभेच्छा दिल्या. ऊस विकास योजनेच्या माध्यमातून कारखान्याच्या सभासदांना मागणीनुसार ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची खते, रासायनिक खते, औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन कारखान्याकडून नेहमी देण्यात येते. ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकर्यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे.
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, कारखान्याचे माजी संचालक जे. जे. पाटील, जयपाल उगारे, कुबेर कमते, फैय्याज बागवान, धनंजय मगदूम, रावसाहेब मुरचिट्टे आणि संचालक सर्वश्री आण्णासो गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सुकुमार किणींगे, अभयकुमार काश्मिरे, सूरज बेडगे, शितल आमण्णावर, संजयकुमार कोथळी, सुमेरु पाटील, जिनगोंडा पाटील, कमल पाटील, वंदना कुंभोजे आणि शिवाजी पुजारी, कृष्णात पुजारी, विलास पाटील, अनिल वडगांवे, सचिन केस्ते, सौरभ पाटील, कार्यकारी संचालक मनोहर जोशी व सर्व अधिकारी आणि हितचिंतक उपस्थित होते.