कापशी (प्रतिनिधी) ::सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयातील सा. वि. खतकल्ले सभागृहात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले राज्यातील 34 जिल्ह्यात केंद्रांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही केंद्रे स्थापन करण्या पाटील राज्याची व केंद्राची भूमिका स्पष्ट केली .कुशल भारत निर्माण करण्यासाठी आणि भारताला अर्थव्यवस्थेच्या पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी ही योजना उपयोगी ठरेल. देशाच्या विकासात ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराची संधी देण्यासाठी या प्रशिक्षणाचा फायदा होईल असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले .
सेनापती कापशील प्रियदर्शनी ग्रामीण स्किल सेंटरचे समन्वयक विनय गणबावले व पृथ्वीराज जगदाळे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र मार्फत सोशल मीडिया एक्झिक्यूटिव्ह व पॅटर्न मास्टर चे कोर्स युवकांना मोफत शिकवण्यात येणार आहे यात प्रशिक्षित झालेले युवकांना नोकरीची संधी सुद्धा ही केंद्र देणार आहेत तर उद्योग करायचा असेल तर त्यांना शासकीय कर्ज योजनेसाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळ पुरवठा करणारा सर्वात मोठा देश बनवायचा आहे
या कार्यक्रमास हमिदवाडा सहकारी कारखान्याचे संचालक प्रदीप चव्हाण ,जलयुक्त शिवार चे अध्यक्ष अध्यक्ष उमेश देसाई ,कापशीच्या सरपंच उज्वला कांबळे,रानडे विद्यालयाचे प्राचार्य एस.डी माने, जयवंत मेस्त्री, तुकाराम भारमल,संजय बरकाळे मिनल चोथे,चंद्रकांत माळी तसेच भागातील विविध ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते. शासन प्रतिनिधी म्हणून हमिदवाडा आय टी आय चे प्राचार्य अमोल वास्कर तर कौशल्य विकास कार्यालयचे संभाजी पोवार यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले.35 शासकिय अधिकाऱ्यासह सुमारे 750 युवक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.