दुसऱ्या मुलाशी बोलल्याच्या रागातून काकानेच केली पुतणीची हत्या

अहमदनगर : बुधवारी रात्री सव्वा बारा वाजल्याच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे.दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याचा राग येऊन काकानेच आपल्या विवाहीत पुतणीला संपवल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडली असून पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासात काकाचे देखील पुतणी सोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

विवाहानंतर गेल्या काही महिन्यांपासून माहेरी राहणारी 21 वर्षीय विवाहित पुतणी ही घराबाहेर येऊन रात्रीच्या वेळेस एका मुलासोबत बोलत होती. दुसऱ्या मुलीसोबत बोलते याचा काकाला राग आला. रागाच्या भरात काकाने पुतणीवर संशय घेत वाद घालण्यास सुरूवात केली आहे. या वादानंतर रागाच्या भरात काकाने दोन्ही पायावर कु-हाडीने वार करून तीला जबर जखमी केले. हल्ल्यानंतर तरूणीने आराडाओरडा केल्यानंतर नातेवाईक गोळा झाले.

🤙 8080365706