मराठा आरक्षणासाठी युवकानं संपवलं जीवन ; चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

मुंबई : राजधानी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली आहे.मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक व्यापक झाला असून राज्यभरात या आंदोलनाचं लोण पसरलं आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी उपोषण करत असताना मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे सर्वत्र पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

आत्महत्येपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना लिहिले पत्र –

सुनिल कावळे हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी होते. सुनिल कावळे यांनी स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेले सुनिल कावळे हे जालन्याहून एकटेच मुबंईत आले होते. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. आत्महत्येच्या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मराठा आरक्षणबाबत सरकारकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ सुनिल कावळे यांनी आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

🤙 8080365706