पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा असणाऱ्या कोण आहेत काँग्रेस नेत्या दिव्या मारुंथैया ?

नवी दिल्ली: तामिळनाडू काँग्रेसच्या सरचिटणीस दिव्या मारुंथैया यांनी सोमवारी X वर केलेल्या ट्विटने वाद निर्माण केला. त्यांनी उघडपणे पाकिस्तानचे समर्थन केले. वास्तविक, त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांचे समर्थक भाजपच्या झेंड्यासह दिसत होते.१४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा रोमांचक सामना खेळला गेला.

विश्वचषकाच्या इतिहासातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा ८वा सामना होता. मात्र, दरवेळेप्रमाणेच यावेळीही भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताचा पाकिस्तानवरचा हा विजय काही भारतीयांनाच पचवता आलेला नाही, हे विशेष. विशेषत: सत्तेत असलेला भाजपचा विरोधी पक्ष सतत विष ओकत आहे. आता काँग्रेसच्या एका नेत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पाकिस्तानने विश्वचषक जिंकल्याबद्दल त्यांनी केलेल्या ट्विटने मोठा वाद निर्माण केला.

ट्विटर वर ट्विट केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, ‘हे लक्षात ठेवा, ठीक आहे. या देशाचा धार्मिक अतिरेक्यांनी पराभव केला आहे. मला आशा आहे की पाकिस्तान हा विश्वचषक जिंकेल. जय श्री राम.’ त्यांच्या या ट्विटनंतर गदारोळ आणि वाद निर्माण झाला होता. X वरील नेटकऱ्यांनी त्यांना फटकारण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. एक भारतीय नागरिक पाकिस्तानने विश्वचषक जिंकावा असे बोलत आहे हे दुःखद आहे.

🤙 9921334545