सांगरूळ परिसरातील शेतकऱ्यांचा महावितरला मोर्चाद्वारे इशारा

सांगरूळ: कृषी पंपाची वीज बिले मीटर रिडींग प्रमाणे दुरुस्त करून द्यावीत त्याशिवाय आम्ही एक रुपया देखील वीज बिल भरणार नाही . पिकांसाठी सध्या पाण्याची नितांत गरजगरज आहे . चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेल्या वीज बिलांच्या बाकीचा मुद्दा पुढे करून कृषी पंपाची वीज कनेक्शन जोडणी न थांबवता ताबडतोब जोडून द्यावीत . विज जोडणी न केल्याने पिकांचे नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी महावितरण जबाबदार राहील.

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका .कृषीपंप धारकांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सांगरूळ परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून दिला आहे .
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले महावितरणने प्रत्येक कृषी पंपाला मीटर बसवले असून त्या मीटर वरील रीडिंग नुसार जेवढी विज वापरले असेल तेवढ्या प्रमाणात विज बिल आकारणी केली जात होती .महावितरण कडून या मीटरचे भाडे देखील वीज बिलात ऍड करून शेतकऱ्यांच्या कडून वसूल केले जात होते .

चार-पाच वर्षा पासून महावितरणने पाच-सहा गावाचे एक फिटर तयार करून त्या फिडरवरील मीटरवर येणारे रीडिंगची विभागणी त्या फिटर अंतर्गत येणाऱ्या सर्व कृषीपंप धारकांना हॉर्स पॉवरच्या प्रमाणात करण्याचा अजब प्रयोग सुरू केला आहे . यामुळे कृषी पंप धारकांना अवाढव्य बिले आली आहेत .आम्ही जेवढी विज वापरली आहे .तेवढीच बिल आकारणी आमच्याकडून व्हावी ही प्रामाणिक भावना शेतकरी वर्गाचे आहे .शेतकऱ्यांची गळचेपी महावितरणने थांबवावी अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला .

कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रम पाटील (किणीकर ) यांनी कृषीपंप धारक शेतकरी हा प्रामाणिकपणे वीज बिले भरणारा महावितरणचा ग्राहक आहे .कृषी पंप धारक शेतकऱ्यांच्या वर लादलेली अन्यायकारक वीज बिले दुरुस्त करून द्यावीत अन्यथा तीव्र लढा उभा करू असा इशारा यावेळी दिला .

करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी गेली चार वर्षे चुकीच्या पद्धतीने वीज बिलांची आकारणी केली आहे. .पावसाळ्याच्या काळात मोटर बंद असतानाही काही शेतकऱ्यांना बिले आली आहेत .काही शेतकऱ्यांनी पिके वाळून जाऊ नयेत या भीतीपोटी अशी वीज बिले भरली आहेत .अशा शेतकऱ्यांची वीज बिले मीटर वरील रीडिंग प्रमाणे दुरुस्त करून जादा वसूल केलेली जादा रक्कम त्यांना परत द्यावी अशी मागणी केली .

प्राध्यापक टी एल पाटील , उत्तम कसोटे, सुनील कापडे यांनी महावितरण ट्रान्सफॉर्मवरील खराब झालेल्या फ्युज बदलण्यासाठी किंवा इतर दुरुस्तीसाठी संबंधित ट्रान्सफॉर्मवरील कृषी पंप धारकांच्या कडून वर्गणी काढून पैसे घेतले जातात .वीज पुरवठा करणाऱ्या तारांच्या संपर्कात येणाऱ्या झाडाच्या फांद्या मारणे .खराब झालेले पोल बदलणे यासाठी शेतकऱ्यांना कामे लावली जातात मग महावितरण करते काय? असा सवाल करून भविष्यात हे थांबले पाहिजे .शेतकऱ्याचा सहनशीलतेचाअंत पाहू नका अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला .
यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने महावितरणचे ग्रामीण विभाग अभियंता दीपक पाटील फुलेवाडी उपविभागाचे अभियंता आंबी यांना निवेदन देऊन मागण्या मान्य करण्याबाबत इशारा दिला .यावेळी घाटांगळी फिडरअंतर्गत येणाऱ्या सांगरूळ परिसरातील सर्व गावातील कृषी पंप धारक शेतकरी नेते कार्यकर्ते उपस्थित होते .स्वागत उत्तम कसोटे यांनी केले आभार सुनील कापडे यांनी मानले .

       सर्वपक्षीय आंदोलन 

मिटर रिडींग प्रमाणे वीज बिले दुरुस्त करून मिळावीत यासाठी सांगरूळ सह परिसरातील शेतकरी गेली चार-पाच वर्षे प्रयत्न करत आहेत . सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन दिले आहे .शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांना सुद्धा शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे .तरीही कोणी दखल घेतलेली नाही . सर्व नेते म्हणतात आम्ही शेतकऱ्याचे मुली आम्ही शेतकऱ्याचे कैवारी मग शेतकरी विरोधी निर्णय का ? आज शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर परिसरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी याला पाठिंबा दिला आहे .वीज बिले पूर्ववत मीटर रीडिंग प्रमाणे दुरुस्त करून मिळत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा व वीज कनेक्शन जोडून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे