महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची नॉर्मल लेव्हल किती असायला पाहिजे? जाणून घेऊयात..

आजच्या काळात खाण्यापिण्याच्या विकारांमुळे आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे महिलांमध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. तळलेले, मसालेदार पदार्थ आणि फास्ट फूडचे सतत सेवन केल्याने हाय कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.

उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी आहार आणि जीवनशैली या दोन्हीची विशेष काळजी घेतली पाहिजे. आज आपण महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची साधारण पातळी किती असायला हवी ते जाणून घेऊया. शरीरात चरबीचे दोन प्रकार आहेत – एक हाय डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि दुसरा लो डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL). एचडीएल कोलेस्ट्रॉल हे गुड कोलेस्टेरॉल आणि एलडीएलला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या स्थितीला हाय कोलेस्टेरॉल म्हणतात. जेव्हा हे कोलेस्ट्रॉल रक्तात वाढते तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे, तुम्हाला उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर आजारांचा धोका असतो. वयाच्या ३५ वर्षांनंतर महिलांनी शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी काय असते आणि ते वाढू नये यासाठी काय केले पाहिजे ते आज आपण जाणून घेणार आहोत.महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची नॉर्मल लेव्हल किती असायला पाहिजे?जास्त तेलकट, जंक फूड आणि अनहायजिनिक पदार्थ खाल्ल्यास आणि शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय राहिल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने केवळ हृदयासंबंधित आजारांचाच धोका नाही तर अनेक गंभीर आजारांचाही धोका निर्माण होतो. उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही उद्भवू शकते. हल्ली तरूण पिढीसुद्धा अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहे. लखनौचे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. के.के. कपूर यांनी ओनली माय हेल्थशी बोलताना असे सांगितले की, “महिलांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका आधुनिक जीवनशैली आणि आहार-संबंधित सवयींमुळे वाढतो. कोलेस्ट्रॉलची पातळी वयानुसार आणि शारीरिक स्थितीनुसार प्रत्येक व्यक्तीत वेगळी असू शकते. परंतु ही पातळी कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास प्राणघातक ठरू शकते. (Health)High Cholesterol : हाय कोलेस्टेरॉलला शरीरातून खेचून बाहेर काढतील ही फळे; आजच डायटमध्ये करा समाविष्ट! महिलांमध्ये वयानुसार कोलेस्ट्रॉलची पातळी खालीलप्रमाणे असली पाहिजे20 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी खालीलप्रमाणे असावीLDL- 100 mg/dl पेक्षा कमीHDL- 50 mg/dl किंवा अधिकएकूण कोलेस्ट्रॉल- 125 ते 200 mg/dlनॉन एचडीएल – 130 mg/dl पेक्षा कमी25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी खालीलप्रमाणे असावीLDL- 100 mg/dl पेक्षा कमीHDL- 40 mg/dl किंवा अधिकएकूण कोलेस्ट्रॉल- 125 ते 200 mg/dlनॉन एचडीएल – 130 mg/dl पेक्षा कमी