एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांनी केली रेल्वे स्टेशनवर स्वच्छता

रत्नागिरी :राज्यातील सर्व एड्स नियंत्रण कर्मचारी आपल्या न्याय मागण्यांसंदर्भात नॅको नवी दिल्ली येथे जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारीही रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनां नुसार म.गांधी जयंती निमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान राबवले जात आहे.

कोल्हापूरच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर व आरवली या रेल्वे स्थानकावर स्वच्छता केली.प्लास्टिक बॅग्ज, प्लास्टिक बॉटल,चहाचे कप, कचरा एकत्र करण्यात आला.तसेच प्रवाश्यांना सार्वजनिक स्वच्छ्तेबाबत प्रबोधन केले. प्रवासातही स्वच्छता व जनजागृती करत सामाजिक बांधिलकी जपल्याने रेल्वे अधिकारी व प्रवासी यांनी कौतुक केले.जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.