कोल्हापुरात उत्साहवर्धक वातावरणात विसर्जन मिरवणूकीला सुरुवात…

कोल्हापूर : कोल्हापुरात अतिशय उत्साहात आणि आनंदात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.जिवंत देखाव्यासह ढोल ताशांचा गजर हे यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे.

बिनखांबी गणेश मंदिर चौकात ढोल पथकाने चांगलाच ठेका धरला.मानाचा पहिला गणपती मार्गस्थ झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.अनेक मंडळांच्या ढोल पथकांचा उत्साह टिपेला पोहोचला आहे.

सकाळपासूनच मिरवणुकीत ढोल पथकांनी वातावरण निर्मिती केली आहे.,कोल्हापुरात सकाळी नऊच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे.मानाचा पहिला गणपती मिरवणुकीत मार्गस्थ करण्यासाठी सर्वपक्षीय नेते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते

🤙 9921334545