राधानगरी : अरविंद पाटीलगुडाळ येथिल श्रृती शामराव पाटील हिच्या तृतीय स्मृतीदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापुर यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबीरात शनिवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर गुडाळ, ता. राधानगरी येथे ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सगळ्या दानांमध्ये रक्तदान हे श्रेष्ठदान मानले गेले असल्याने या शिबिरात अधिकाधिक व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले होते. त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तदान करणाऱ्यास उपहार व भेटवस्तु देण्यात आली. भविष्यात असेच विधायक उपक्रम राबविणार असलेचे कै. श्रृतीचे वडील शामराव पाटील यांनी सांगितले. वैभवलक्ष्मी ब्लड बँक व्यवस्थापणाचे व सर्व रक्तदात्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.