भारतातील जी ट्वेंटी परिषदेमुळे पाकिस्तानात घबराट….

नवी दिल्ली: G-20 परिषदेचं यजमानपद भारत भूषवत आहे. यानिमित्तानं जगभरातले दिग्गज नेते येत्या १० सप्टेंबरला दिल्लीत एकत्र येणार आहेत. भविष्यातील आव्हानांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. भारतात होणा-या या बैठकीमुळं पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे.

पाकिस्तानला एवढी भीती वाटण्याचं कारण काय? भारतात G-20 चा ग्लोबल इव्हेंन्ट होत असताना, पाकिस्तानात आंदोलनं सुरू आहेत. काश्मीर मुद्यावर आता पाकिस्तानचा आवाज कुणीच ऐकणार नाही, अशी भीती पाकिस्तानी अधिका-यांना वाटतेय. पाकिस्तानच्या विरोधात गिलगिट-बालटिस्तानमध्ये जोरदार आंदोलन, निदर्शनं सुरू आहेत. पाकिस्तानी सैन्यालाही या आंदोलकांना नियंत्रणात आणणं अवघड झालंय. सीमापार असलेल्या काश्मिरींना आता भारतासोबत यायचंय. भारतानं सीमा खुली केली तर पाकिस्तानातील अनेक लोक भारतात निघून जातील, असं सांगितलं जातंय.

केवळ गिलगित बालटिस्तानच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानात वातावरण बिघडलंय. G-20 परिषदेमुळं हवालदिल झालेलं पाकिस्तान सरकार आता सौदीच्या प्रिन्सच्या पाया पडू लागलंय. सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान G 20 परिषदेला जाण्यापूर्वी थोडावेळ पाकिस्तानात थांबतील. प्रिन्स सलमानला इस्लामाबादला आणण्यासाठी पाकिस्तानी सरकारनं पायघड्या अंथरायला सुरूवात केलीय. भारताची वाढलेली ताकद आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली पत यामुळं पाकिस्तानचा थरथराट सुरू झाला आहे. काश्मीरबाबत आजवर केलेल्या अपप्रचाराचा बुरखा टराटरा फाटतोय. अवघ्या जगासमोर बेइज्जती होत असल्यानं पाकिस्तान घाबरलं.