गणेशोत्सव, दिवाळीला गोरगरीबां साठी आनंदाचा शिधा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. गोरगरीबांसाठीही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव, दिवाळीला गोरगरीबांना अवघ्या 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यामुळे लाखो गोरगरीबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गौरी गणपती आणि दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. त्यात प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल आदी साहित्य देण्यात येणार आहे. त्यावर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला.