जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी

जयसिंगपूर: कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऊस वाहतूकदारांना तोडणी मुकादमांनी मोठ्या प्रमाणात गंडा घातला असून गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऊस तोडणी मुकादमांवर जवळपास 1600 तक्रारी दाखल झाल्या असून आत्तापर्यंत साडेसातशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तरी ती पूर्वीच्या गतीनेच गुन्ह्यांची नोंद होऊन मुकादमांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी तसेच गुन्हा नोंद करण्याच्यापूर्वी सदर मुकादमास खात्याकडून पूर्व सूचना अथवा नोटीस द्वारे गुन्हा नोंदणीची कल्पना देऊन वाहतूकदार व मुकादम यांनी समन्वयातून विषय संपवण्यासाठी मदत व्हावी. झिरो नंबर ने गुन्हे नोंद करण्यात येऊ नयेत तसेच नोटरी कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्यात केलेली असूदे ऊस वाहतूकदार ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये राहतो त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंदवून घेण्यात यावी एकाच मुकादमाने एकापेक्षा जास्त वाहतूकदारांना फसवणूक करणाऱ्या मुकदमाना तत्काळ अटक करण्यात यावी. महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांचे मुकादम कर्नाटक विजापूर व इतर जिल्ह्यामधील तेथील पोलीस प्रमुखांच्याशी सुद्धा संपर्क होऊन त्या मुकादमावर कारवाई व्हावी. जर एखाद्या साखर कारखान्याने जप्त केलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाची विक्री पूर्वसंमती अथवा पूर्वसूचना न देता जर विक्री केली असेल तर सदर कारखाना प्रशासनावर फौजदारी तसेच फसवणुकीचा व आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा ,ज्या दिवसापासून वाहन कारखान्याच्या ताब्यात आहे त्या दिवसापासून आज अखेरचे किमान भाडे वाहतूकदाराच्या कर्ज खात्यावरती वर्ग करण्यात यावे या व इतर मागण्यांची विस्तृतपणे चर्चा पोलिस प्रमुखांशी झालेली आहे तरी त्यांनी त्या सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या आठ तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सांगण्यात येईल असे सांगितले यावेळी सुकाणू समितीचे प्रमुख संदीप राजोबा कर्नाटक स्वाभिमानी सुकाणू समितीचे प्रमुख अरिहंत ग्रुप चे राजू पाटील रावसाहेब अबदान विठ्ठल पाटील तात्या दादा पाटील प्रवीण शेट्टी विनोद पाटील शिवाजी पाटील संदीप मगदूम अशोक कुन्नुरे दत्ता बाबर वसंतराव प्रभावळे, पिराजी पाटील, भिकाजी पाटील, रामराव देसाई, युवराज माळी, रघुनाथ कांबळे, धोंडीराम कांबळे, पोपट जाधव, कृष्णा सावंत , महावीर मगदूम, विनोदकुमार चौगुले, गब्बर पठाण, अनिल कुनुरे , अशोक पाटील, दीपक दिडे व मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूकदार उपस्थित होते

🤙 8080365706