क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांना अटक करण्याची मागणी

कोल्हापूर : क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांना अटक करुन त्यांची ईडीची चौकशी व नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले त्यांच्याकडून करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ताब्यातील जागा सि.स.नं. २८१४ /क (जय प्रभा स्टुडिओ) ही जागा क्षिरसागर कुटुंब व सचिन राऊत (पानपट्टी चालवणारा) यांनी चुकीच्या पध्दतीने शासनास व मिळकत धारकास घेऊन चुकीच्या पध्दतीने कागदपत्रे दाखवून दि. १५/०२/२०२० रोजी खरेदीपत्र केले. मुळात संस्थान काळात पेंढारकर कुटुंबियांना शर्ती व अटींवर ही जागा संस्था नावे दिली होती. (अट स्टुडिओसाठी सदर जागेचा उपयोग करावा व ही जागा शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतर करता येणार नाही.) तरीही पेंढारकर व लता मंगेशकर यांनी वेगवेगळी शक्कल लढवत लिलाव पध्दतीने ती जागा लता मंगेशकर यांना हस्तांतरीत केली. त्याचवेळी अटी व शर्तीचा भंग झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाची फसवणुक किंवा विना परवाना मंगेशकर कुटुंबियांनी ती जागा सचिन राऊतना खरेदी दिली.

खरेदी पत्रामध्ये ६,५०,००,०००/- सहा कोटी पन्नास लाख रुपये एका रकमेने पानपट्टी चालवणारा सचिन राऊत ने भरले आहे. व काळा पैसा किती दिले असतील त्याचा हिशोबच नाही. यातुनच एक पानपट्टीवाला इतका पैसा कोठून आणतो यासाठीच त्याची तेलगी स्टॅम्प घोटाळयाप्रमाणे नार्कोटेस्ट घेणेत यावी. मुळातच क्षीरसागर कुटुंबियांनी ऋतुराज क्षीरसागर याचा हस्तक्षेप आहे व अनावधनाने क्षीरसागर यांच्या मुलांनी पैसे गुंतवणे हे मान्यच केले होते त्याची व्हीडीओ क्लीप आजही आहे म्हणून राज्य शासनाने क्षीरसागर व राऊत यांनी राज्यशासनाची व संस्थानकालीन शर्त व अटींची पाळवणुक न राखता खरेदी दस्ताऐवज केला. यामुळे क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत (पान पट्टीवाला) यांना बेड्या ठोकून यांची नार्कोटेस्ट करुन त्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन अटक करावी. अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण विष्णूपंत इंगवले यांनी केली.

🤙 8080365706