
मुंबई : दंगली झाल्या नाही तर मोदी हे पंतप्रधान होणार नाही. मी जिथून निवडणूक लढतो तिथे देखील दंगली घडवून आणण्याच काम केल गेलं. पण आम्ही आमच्या जनतेला समजावलं, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी ज्ञानव्यापीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ज्ञानव्यापी हा मुद्दा आताचा नाही. ब्रिटिशांच्या आधीपासूनचा हा मुद्दा आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.मणिपूरमधील हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं आहे. मणिपूरमधील कुकी समाजावर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत आणि त्यात 40 जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. कुकी समाजाने आता तिथे एक नवीन संघटना बांधली आहे. त्यामुळे तेथील मुस्लिम समाजाने त्यांना मदत केली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.यावेळी औरंगजेबाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोणाला वाद हवा आहे? मी औरंगजेबाच्या मजारीवर गेल्यानंतर शांतता निर्माण झाली, हे तुम्ही पाहिलं असेल, असंही ते म्हणाले.
