राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 खुला असून सध्या धरणातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यातील धरण पाणीसाठाकोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आली आहे. राधानगरी – 8.26 (8.361 टी. एम. सी), तुळशी 2.59 (3.471 टी. एम. सी), वारणा 29.24 (34.399 टी. एम. सी), दुधगंगा 20.55 (25.393 टी. एम. सी), कासारी 2.63 (2.774 टी. एम. सी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.41 (2.715 टी. एम. सी), पाटगाव 3.33 (3.716 टी. एम. सी), चिकोत्रा 1.23 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.89 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टी. एम. सी ) आंबेओहोळ 1.24 (1.240 टी. एम. सी ), कोदे ल.पा. 0.21 (0.214 टी. एम. सी )

🤙 8080365706