राहुल गांधी यांना खासदारकी बहाल

दिल्ली : खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा त्यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे.

मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरत जिल्हा सत्र न्यायालयाकडून राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी राहुल गांधी यांना अपात्र घोषित करत त्यांचे खासदारकीपद रद्द करण्यात आले होते. ज्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयाच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेला गुजरात न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर राहुल गांधीनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले.या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (दि. ०४ ऑगस्ट) निकाल देत राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. ज्यानंतर आज ७२ तासांनी राहुल गांधी यांना पुन्हा त्यांची खासदारकी बहाल करण्यात आली. आज लोकसभा सचिवालयाकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.

🤙 8080365706