कोल्हापुरात ‘राजेश युथ फेस्टिव्हलचे’ आयोजन

कोल्हापूर : युवा सेना आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने मैत्री दिनानिमित्त “राजेश युथ फेस्टिव्हल” चे मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले होते.

गेली दहा फ्रेन्डशिप डे निमित्त मैत्री युवा महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाची भव्यता वाढविण्यात आली असून महाविद्यालयीन युवा वर्गास शिक्षणासोबतच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची संधी आणि हक्काचे व्यासपीठ राजेश युथ फेस्टीव्हलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले.राजेश युथ फेस्टीव्हल अंतर्गत पार पडलेल्या फुटबॉल टर्फ स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, आर्ट स्पर्धा, फॅशन शो, डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्वांचे बक्षीस वितरण यावेळी पार पडले. युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल,प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. हे वर्ष भारत देश स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून, तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात तरून वर्गाला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी आणि भ्रष्टाचार मुक्त भारताची बीजे युवा पिढीतून रोवली जाणे गरजेचे असून, देशसेवेसाठी आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या हेतूने युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे. युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर त्यांनी व्यक्त केला.

🤙 8080365706