
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ ऑगस्ट) ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांनाही लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या 70 वर्षात यांनी एकही युद्धस्मारक बांधलं नाही.

आमच्या सरकारने जेव्हा ते बांधलं तेव्हा मात्र यांनी विरोध केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टेच्यू ऑफ युनिटी येथे जाऊन कधी आदरांजली वाहिली नाही. आमचं सरकार हे सकारात्मक राजकारणावर लक्ष केंद्रित करत आहे, यांच्या (विरोधकांच्या) असल्या क्षुल्लक राजकारणापेक्षा आम्ही विकासाला प्राधान्य देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशाचा विकास हा देशातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचावा यााठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत”. यावेळी मोदींनी त्यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ घोषणेचाही उल्लेख केला. भारतीय रेल्वेचं कौतुक करत पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या रेल्वेने अलिकडच्या काही वर्षांमध्ये १५ लाखांहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
