अमित शहा यांच्या दौऱ्यात बदल : थेट दिल्लीला रवाना

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवारी) संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी तब्बल ४ तासांची राखीव वेळ ठेवली होती. मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये तातडीने मोठा बदल झाला असून चिंचवडमधील कार्यक्रमानंतर थेट दिल्लीला रवाना होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी पुण्यात दाखल झालेत. अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी राखीव वेळ ठेवला होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते.

🤙 8080365706