कोल्हापुरातील भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

कोल्हापूर : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या गटात जातील असा सर्वच राजकीय पक्षांचा कयास होता. राष्ट्रवादीतून 40 आमदार गेल्यानंतर अजितदादांकडे येणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. ज्या पद्धतीने शिंदे गटात ठाकरे गटाकडून येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे, त्याप्रमाणे शरद पवार गटातून येणाऱ्यांचा ओघ अजितदादा गटाकडे दिसत नाही.कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवायचं जाहीर केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात पर्यायी नेत्यांना जोडायला सुरवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील चंदगड येथील भाजपचे नेते सुरेश घाडगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

सध्या राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या फुटी नंतर ते अजितदादा गटाकडे गेले. त्यामुळे चंदगड विधानसभेत शरद पवार गटाकडून आश्वासक चेहऱ्याची पाहणी केली जात होती. सुरेश घाडगे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अनेक कार्यकर्त्यांसोबत शक्ती प्रदर्शन करत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून पुन्हा नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे.

🤙 8080365706