प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर आज अंत्यसंस्कार

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यापूर्वी दुपारी १२ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओ येथे ठेवण्यात येणार आहे. सध्या नितीन यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर मुंबईतील जेजे रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आज सकाळी जेजे हॉस्पिटलमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली.नितीन देसाई यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये आत्महत्या हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीन देसाई यांच्या मुलीसह कुटुंबातील काही सदस्य परदेशातून येणार आहेत. ते भारतात आल्यानंतर कलादिग्दर्शकाचे पार्थिव कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये नेण्यात येणार आहे.

🤙 8080365706