
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 5 व 6 उघडले आहेत. त्यामधून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.भोगावती नदीवरील – तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.वारणा नदीवरील – चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची व शिगांव.दुधगंगा नदीवरील – दत्तवाडकासारी नदीवरील – यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे असे 22 बंधारे पाण्याखाली आहेत.पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 29 फूट, सुर्वे 28.7 फूट, रुई 57.9 फूट, इचलकरंजी 54.6, तेरवाड 48.9 फूट, शिरोळ 41.6 फूट, नृसिंहवाडी 41 फूट, राजापूर 29.3 फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 14.3 फूट व अंकली 19.4 फूट अशी आहे.
