क्रांतीदिनी चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा

कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून क्रांतिदिनी,९ ऑगस्ट रोजी के. चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. अशी माहिती शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.

दहा हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी एक वाजता हा सन्मान सोहळा होत आहे. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीमध्ये सहभागी होणार आहेत.पत्रकार परिषदेत बोलताना रघुनाथदादा पाटील यांनी मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीकास्त्र सोडली. तसेच शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरही टीका केली.‘शेतकरी संघटना ही अराजकीय संघटना आहे. शेतकरी संघटनेचे अस्तित्व कायम ठेवून आम्ही सगळे बीआरएसमध्ये काम करणार आहोत. माझ्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकरी संघटनेच्या मागण्या यासंबंधी सविस्तर चर्चा केली आहे. राव यांचे सरकार हे शेतकरी हिताचे धोरण राबवित आहे. म्हणून त्यांचे हात बळकट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”असे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी बीआरएसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रो. तोहिफ बक्षू, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा संघटक, राजेश नाईक, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अमृता सुर्यवंशी, गुणाजी शेलार, शेखर म्हस्के, मुकुंद मोरे आदी उपस्थित होते..

🤙 8080365706