
कोल्हापूर : सध्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक लोकांना डोळ्यांची साथ येत आहे. त्याचबरोबर डोळ्यांचा नवीन आजार समोर आला आहे, तो म्हणजे कंजक्टिवायटिस. डोळ्यांची योग्य ती काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास यामुळे होणाऱ्या दूरगामी समस्या टाळता येऊ शकतात.

हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो. तसेच बॅक्टेरिया (व्हायरस) सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा आजार पसरतो. याबाबत जनतेने घाबरुन न जाता आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. कंजक्टिवायटिसला पिंक आय असे देखील म्हणतात. कंजक्टिवा (नेत्रश्लेष्मला) म्हणजेच डोळ्याच्या पांढऱ्या भागावरती असलेल्या पातळ ऊतीची आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह होण्याची शक्यता असते. कंजक्टिवाइटिस हा डोळ्यांचा आजार कुणालाही होऊ शकतो. पण, लहान मुलांमध्ये हा आजार प्रामुख्याने जाणवू शकतो. यासाठी लक्षणे आढळल्यास आजारावर योग्य तो उपचार घेणे आवश्यक आहे.कंजक्टिवायटिसची लक्षणे : कंजंक्टायवायटिस (नेत्रश्लेष्मला) वरती सूज येणे, डोळ्याचा पांढरा भाग किंवा पापणीचा आतील भाग लाल होणे, डोळ्यांची आग होणे आणि खाज सुटणे, धुसर दृष्टी आणि प्रकाशाप्रती संवेदनशीलता, डोळ्यातून स्त्राव येणे आदी.
