
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना शहीदांच्या सन्मानात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान सुरु करण्याची घोषणा केली.

ते म्हणाले, देशात सध्या अमृत महोत्सावाची चर्चा आहे. 15 ऑगस्ट जवळ येत आहे. शहीद वीर आणि वीरांगणांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना सन्मान देण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान सुरु केले जाईल. या अभियानातून देशभरातील शहीदांना नमन केले जाईल. त्यांचे स्मरण केले जाईल. देशातील लाखो ग्राम पंचायतींमध्ये विशेष शिलालेख स्थापन केले जातील.
पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या वर्षी स्वातंत्रदिनी ‘हर घर तिरंगा अभियान’त संपूर्ण देश एकत्र आला. त्याच पद्धतीने यावर्षी देखील प्रत्येक घरावर तिरंगा फडकला पाहिजे. हे अभियान आणि ही परंपरा सातत्याने पुढे घेऊन गेलं पाहिजे.
