
कळंबा : कोल्हापूरचा सौंदर्य खुलवणारा ऐतिहासिक शाहू कालीन कळंबा तलाव शनिवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला. हे वृत्त सगळीकडे समजतात तलावाकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

यंदा जुन महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने तलावाची पाणीपातळी चार फुटांवर स्थिरावली होती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने तलावाचे मुख्य स्रोत असणारे कात्यायनी डोंगरातुन वाहणारे सातही नैसर्गिक नाले दुथडी भरून वाहू लागले आणि अवघ्या आठवड्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला. पोलिस बंदोबस्ताची गरज रविवारी पर्यटकांची होणारी गर्दी विचारात घेता धोकादायक सांडवा मनोऱ्या नजीक महिलांची छेडछाड, मद्यपान करून हुल्लडबाजी करणे असे विकृत प्रकार व हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
