मणेरमळा येथे महिलांसाठी खास ‘भव्य रोजगार मेळावा

उंचगाव: पैकी मणेरमळा येथे सुकून फॅशन इन्स्टिट्युट तर्फे महिलांसाठी खास ‘भव्य महिला रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर महिलांसाठी पाककला स्पर्धा, फॅशन शो या स्पर्धांचेही आयोजन केले होते. याप्रसंगी पाककला स्पर्धेची पाहणी करत महिलांच्या पाककलेचे कौतुक केले व स्पर्धांतील विजेत्या महिलांचा सत्कार करत अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मा.जि. प अध्यक्षा सौ. शौमिका अमल महाडिक, ग्रा. पं. सदस्य श्री. तलहा इरफान मणेर, सुकून फॅशन इन्स्टिट्युटच्या अध्यक्षा सौ. राबिया शेख, सौ. प्रतिभा जाधव, सौ. सोनाली कोपा, सौ. उमा चौगुले, सौ. रमा बेळगांवकर, सौ. सोनाली कोपा, सौ. पद्मावती डफळे, सौ. संगिता कुंभार श्री. दत्तात्रय तोरस्कर, उमेश पाटील,रुपेश परीट यांच्यासह इतर मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

🤙 8080365706