
कोल्हापूर : मंगळवारी कोल्हापूर शहरात ऐतिहासिक खासबाग मैदानाची भिंत अंगावर पडून अश्विनी आनंदा यादव यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर सौ संध्या तेली या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेतील मृत्यू व जखमीच्या वारसांना पाच लाख रुपये तात्काळ निधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करवीर तहसीलदारांच्याकडे करण्यात आली आहे.

शहरात घडलेल्या या घटनेनंतर आज भाजपा शिष्ठमंडळाने अॅस्टर आधार याठिकाणी जाऊन डॉक्टर एम.एस.कुलकर्णी यांच्याकडून जखमी सौ संध्या तेली यांच्या तब्येतीची माहिती घेतली.पेशंटवर उपचार सुरु असून अधिकच्या तपासण्या सुरु असल्याचे सांगत सौ तेली यांना जबर मुक्कामार बसल्याचे सांगितले.
शहरातील या गंभीर घटनेनंतर “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीद वाक्य असणारी कोल्हापूर महापालिका घटनेतील मृत व जखमींना आर्थिक सहाय्य करण्यात मात्र असमर्थ ठरत आहे. जखमींचा उपचार खर्च व मृताच्या वारसांना मदत याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासन ना जिल्हाधिकारी कार्यालय घेताना दिसत नाहीत. वरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमवेत करवीर तहसीलदार स्वप्नी रावडे यांची भेट घेऊन कालच्या घटनेतील मृताच्या वारसांना व जखमींना तात्काळ ५ लाख निधी मुख्यमंत्री सह्यात्ता निधीच्या माध्यमातून मिळावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली. त्याचबरोबर जखमी सौ संध्या तेली यांच्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून उपचार करण्यात यावेत असे सांगितले.
जखमी सौ संध्या तेली यांच्यावर अस्टर आधार याठिकाणी उपचार सुरु असून शासकीय योजनेतून उपचार न झाल्यास नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून उपचार खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले.
यावेळी सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, सुनीलसिंह चव्हाण, मंडल अध्यक्ष डॉ.राजवर्धन, रवींद्र मुतगी, पाटील, शैलेश आजम जमादार, आप्पा लाड, रशीद बारगीर, विशाल शिराळकर, अतुल चव्हाण, अनिल कामत, महादेव बिरांजे, दत्ता लोखंडे, अनिल पाटील, शाहरुख गडवाले, देवरथ लोंढे, योगेश साळोखे, हेमंत बापू पाटील, दिनेश पसारे, किरण तासगावे, सतीश पाटील, विश्वास जाधव, प्रवीणचंद्र शिंदे ई. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
