
कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह स्वच्छतागृहाला लागून असलेली खासबाग मैदानाची संरक्षक भिंत संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला सापडल्या होत्या. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यामधील अश्विनी आनंदा यादव (वव 45, साई पार्क, भोसलेवाडी रोड, कसबा बावडा) या महिलेचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला असून दुसरी महिला संध्या प्रशांत तेली (वव 30, रा. वडणगे, ता करवीर) ही गंभीर जखमी आहे. कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. सुमारे सव्वा तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होत. दरम्यान, आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. त्याचबरोबर रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.
