
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं. ५५ प्रवासी प्रवास करत असलेली बस थेट राजूर घाटात पलटी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याचं कळतंय. अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती कळत आहे.मलकापूर- बुलढाणा बसच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सध्या बाहेर काढण्यात येतंय. ब्रेक फेल झाल्यानेच हा अपघात झाल्याची माहिती सध्या कळत आहे. सुदैवानं अद्याप अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही .
