पुढील आदेश होईपर्यंत बालिंगा पुलावरची वाहतुक बंदच…!

बालिंगा: बालिंगा तालुका करवीर येथील भोगावती नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने राष्ट्रीय रस्ते महामार्ग मंडळ व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पोलिस प्रशासनास आदेश दिल्याने कोल्हापूर गगनबावडा वहातुक पुन्हा एकदा ‌बंद करण्यात आली आहे.

सकाळी सकाळी नोकरदार वर्गाची फार मोठी कुचंबणा झाली. रस्त्यावर अजुन पाणी आलेले नसल्याने रस्ता वहातुकीस खुला करावा कशी वहानधारकांची मागणी प्रशासनाने धुडकावले मुळे प्रसंगी वादावादी होवु लागल्याने करवीर तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी पहाणी करून वहातुक मार्ग बंद करण्यात आलेली आहे.

बालिंगा येथील महादेव मंदिरापासून सकाळ पासून वहातुक‌ बंद करण्यात आलेली होती. परंतु वहानांची गर्दी होवुन अडथळे निर्माण होत असल्याने बालिंगे गांवचे तोडकर यांचे दुकानापासूनच वहातुक रोखुन धरण्यात आली आहे.

परंतु रस्त्यावरून वहातुक करणारे वहानधारक प्रवाशांनी भोगावती नदीवरील पूलाची कोणतीही कमान अथवा पिल्लंर हललेला नाही तर वहातुक का बंद करता असा संतप्त सवाल करत आहे,तसेच प्रशासनाने जर वहातूक बंदच करावयाची असेल तर किमान नोकरदार व विद्यार्थी तसेच आजारी पेशंटची व्यवस्था नांवेतुन अथवा बोटीतून वहातुक व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

🤙 8080365706