बालिंगा व दोनवडे दरम्यान असणारे पुल वाहतुकीसाठी बंद..

बहिरेश्वर प्रतिनिधी / करवीर पश्चिम भाग तसेच पन्हाळ्यातील कळे भाग तर गगनबावड्याला जोडणारा बालिंगा- दोनवडे हा रस्ता आता आपत्ती व्यवस्थापन व प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे.

कारण बालिंगा व दोनवडे दरम्यान असणा-या पुलाची कालमर्यादा संपली आहे… मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण जवळपास पुर्ण क्षमतेने भरले आहे कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून रहदारीसाठी हा रस्ता संपुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी फक्त पावसाळ्यात च शासनाला जाग येते एरवी विसर पडतो का असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.दोन्ही बाजुला बॅरेकेटस लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.कोल्हापुरला रोजंदारीसाठी ये जा करणा-या वर्गाला आता पर्यायी मार्ग म्हणून सांगरुळ,म्हारूळ बहिरेश्वर, बीडशेड, शिरोली, कांचनवाडी, सडोली हळदी व्हाया कोल्हापूर अशी भ्रमंती करावी लागणार आहे म्हणजेच कोंबडी बाराआण्याची आन मसाला रुपायाचा असा म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

🤙 8080365706