भोगावती नदीचा पुल धोकादायक वाटत असल्याने वाहतुक अडविली…

बालिंगा : कोल्हापूर परिसर व धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने भोगावती नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे तसेच ईशारा पातळी वाढत आहे.

त्याच बरोबर भोगावती नदीवरील पुलाशेजारी भराव टाकून बांधकाम होत आहे. पाण्याच्या प्रवाहाची गती वाढत असल्याने भराव खचु लागला आहे. कोणीतरी प्रशासनाला नदीवरील पुलाचा पिल्लर हलत असल्याचे कळविले. प्रशासनाने हि बाब गंभीरपणे लक्षात घेऊन कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील वहातुक बालिंगा येथुन बंद केली. परंतु अद्याप रस्त्यावर पाणी येण्यास किमान पाच ते सहा फुट अंतर आहे त्यामुळे वहानधारक , कर्मचारी व पोलीस यांचे मध्ये बाचाबाची होवु लागल्याने वहातुक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.

🤙 8080365706