
कोल्हापूर : बर्की (ता.शाहूवाडी) येथील मनमोहून टाकणारा धबधबा प्रत्येक वर्षी सर्वांचे आकर्षण असतो. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, साताऱ्या बरोबरच कर्नाटकच्या सिमाभागातील हाजारो पर्यटक येथे हजेरी लावतात. पण आज सकाळी बर्की धबधब्याकडे जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने हा धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.

जिल्हात जोरदार पावसाने ओढे आणि नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली. यामध्ये बर्की धबधब्याकडे जाणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील पुलावर पाणी आल्याने बर्की धबधबा पाहण्यासाठी बंद करण्यात आला आहे.
