पावसाळ्यात सुकामेवा स्टोअर करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

आपण साठवून ठेवलेला सुकामेवा जसे की, काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड हे देखील ऋतूनुसार मऊ पडतात. असे होऊ नये यासाठी पावसाळ्यात सुकामेवा स्टोअर करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवूयात.

हवेच्या संपर्कात आल्यामुळे कोणतीही गोष्ट नक्कीच खराब होऊ शकते. यासाठीच आपण बाजारातून आणलेला सुकामेवा हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा. सुकामेवा डब्यांत स्टोअर करून ठेवताना सुकामेव्याचे सर्व प्रकार निरनिराळ्या बरण्यांमध्ये भरून ठेवा. एकाच बरणीत सर्व प्रकारचा सुकामेवा ठेवू नका. कारण जर एक प्रकार खराब झाला तर त्यामुळे सर्वच सुकामेवा खराब होण्याची शक्यता वाढते.

स्वयंपाकघरात सुकामेवा स्टोअर करताना या गोष्टीसुद्धा अतिशय काटेकोरपणे लक्षात ठेवायला हव्यात. फ्रिजमध्ये मध्ये किंवा थंड ठिकाणी सुकामेवा स्टोअर करून ठेवल्याने तो लवकर खराब होत नाही. मात्र जर आपण अतिशय उबदार किंवा उष्ण तापमान असलेल्या ठिकाणी, ओलसर ठिकाणी किंवा अती उष्ण जागी सुकामेवा ठेवला तर त्याला किड किंवा बुरशी लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण होते.

आपण सुकामेवा जास्त काळ टिकवण्यासाठी ते तव्यावर थोडे रोस्ट करून मग स्टोअर करू शकता. ज्यामुळे त्यांना किड लागणार नाही आणि ते जास्त दिवस टिकू शकतील. आपण ते टेस्टी (Tasty) करण्यासाठी त्यांना खारवून म्हणजेच मीठ (salt) लावून मग ते रोस्ट करून टिकवून ठेवू शकता. ज्यामुळे ते टेस्टी होतील आणि जास्त दिवस टिकतील.

🤙 8080365706