
कोल्हापूर: महाराष्ट्र सरकारच्या हरित महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत क्रिडाई कोल्हापूर,क्रिडाई युथ विंग,क्रिडाई वुमेन्स विंग, यांच्या वतीने पुईखडी, राधानगरी रोड,येथील कोल्हापूर महानगरपालिकेच्या फिल्टर हाऊस परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कवठ,कदंब,करंज,निम,ताम्हाण,जारूळ,अशी देशी पद्धतीची १० फूट उंचीची रोपे लावण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत,उपाध्यक्ष गौतम परमार,सचिव संदीप मिरजकर,खाजणीस अजय डोईजड उपस्थित होते.
क्रिडाई कोल्हापूर हि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संघटना असून क्रिडाईने बांधकाम व्यावसायिकाचे हित जोपासण्याबरोबर कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कार्यरत आहे.तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात.
या वृक्षारोपणावेळी क्रिडाई महाराष्ट्र वूमेन्स विंग च्या को कन्व्हेनर सपना मिरजकर ,क्रिडाई कोल्हापूर वूमेन्स विंग च्या कोऑडोनेटर संगीता माणगावकर,को कोऑडोनेटर मोनिका बकरे,रुपाली बकरे,पूजा वाघुले,गणेश सावंत,विजय माणगावकर,विश्वजित जाधव,दिपक वाघुले,अमोल देशपांडे आदी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
