हवामान खात्याकडून मोठी माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

तीन जिल्ह्यांना डोंगराळ घाट असल्याने त्या भागात मुसळधार पाऊस होणार आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाचं गारवा पसरला आहे. या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात असाचं पाऊस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकणासाठी पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढचे अजून दोन दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर किनारपट्टी भागात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

🤙 8080365706